सुदाम पाटील यांचे सल्लेखनापूर्वक निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सांगवडेवाडी - वसगडेचे माजी सरपंच आणि सहकार, राजकारण क्षेत्रातील धुरिणी सिदगोंडा ऊर्फ सुदाम दादा पाटील (वय ८९) यांचे आज सल्लेखनापूर्वक निधन झाले. १९ डिसेंबरपासून त्यांनी सल्लेखना व्रताला प्रारंभ केला होता. त्यांच्या मागे मुलगा डॉ. सी. एस. पाटील, सून व नातवंडे असा परिवार आहे. सुदाम पाटील यांच्या इच्छेप्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला त्यांचे देहदान करण्यात आले.

श्री. पाटील १९६२ मध्ये करवीर तालुका पंचायत समितीचे उपसभापती होते. १९६६ ते १९९२ अशी सलग २७ वर्षे ते वसगडेचे सरपंच होते. त्यांनी गावातील पहिली पाणी योजना आणली. बेघरांना विक्रमी संख्येत घरवाटप केले. गृहनिर्माण संस्था स्थापन करून जागावाटप केले. स्मशान शेडची निर्मिती केली. सहकार क्षेत्रात त्यांनी भुतृप्ती पाणीपुरवठा योजना, श्री किसान धेनू दूध व्यावसायिक संस्था, कुंभार सोसायटी, सुभाष ऑईल मिल या संस्थांची सुरवात केली. अमित स्पीनिंग मिल व माँटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना गावाशेजारी आणून गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले. सुरवातीला सुदाम पाटील हे राष्ट्र सेवा दलात कार्यरत होते. डॉ. डी. वाय. पाटील, सा. रे. पाटील यांच्याबरोबर त्यांनी सेवा दलाचे काम केले होते.

१९ डिसेंबरपासून त्यांनी सल्लेखना व्रताला सुरवात केली होती. त्यांच्या निवासस्थानी णमोकार महामंत्राचा जप सुरू होता. आज त्यांचे निधन झाले. गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शोकसभेत सरपंच नेमगोंडा पाटील, बाळासो उपाध्ये, प्रा. श्रेणिक पाटील, नांद्रे गुरुजी, डॉ. शीतल पाटील, श्रीकांत हावळ यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून गावकऱ्यांनी सुदाम पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Sudam Patil No more