सहा वर्षांपासून गावाला मोफत पाणी पुरवठा करणारा अवलीया तरुण

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : दुष्काळात पाण्यासाठी रानमाळ हिंडणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना गेल्या सहा वर्षापासून एक तरुण स्वतःची शेती पडीक ठेवून तेच पाणी ग्रामस्थांना मोफत पुरवण्याचे काम करतोय तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील सुदाम शिंदे असे या अवलीया तरुणाचे नाव आहे. दरवर्षी उन्हाळ्यात ते आपल्या बोअरचे पाणी शेती पिकांना न देता ग्रामस्थांना पुरवण्याचे काम करतात. यावर्षीही गावात भयान दुष्काळ असताना त्यांनी आपली बोअर गावकऱ्यांसाठी खुली केली आहे. गावकऱ्यांची मोफत पाण्याची सोय केल्याने अनेक महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट आणि भटकंती काही प्रमाणात थांबली आहे.

माळशिरस आणि सांगोला तालुक्याच्या हद्दीवर साधारण दीड ते दोन हजार लोकवस्तीचं बचेरी हे गाव. येथील शेतकऱ्यांच्या पाचवीला दुष्काळ.. दुष्काळामुळं गावातील निम्या लोकांनी रोजगारासाठी मुंबई, पुणे शहरात स्थलांतर केलं आहे. तर  गावात राहिले आहेत त्यांची पाण्यासाठी पायपीट सुरु आहे. दुष्काळी गाव म्हणून शिक्का बसलेल्या  गावातील कोरडवाहू शेती.. पाणी नसल्याने ती आता उजाड बनली आहे.

टॅंकरची मागणी करुनही गावात पंधरा दिवसातून एकदा टॅंकर येतो. त्यामुळं  बायका, मुलं आपला जीव धोक्यात घालून विहीरी, बारवामधून पाणी काढतात. तरीही प्रशासनाला येथील लोकांच्या जीवाची चिंता ना काळजी... अशा दुष्काळी परिस्थिती देखील येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुदाम शिंदे यांच्या घराजवळील बोअरला जेमतेम पाणी आहे. दिवसभरात तासभर बोरला पाणी येते. हीच कुठे तरी गावकर्यांसाठी आणि त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब. येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी कुचंबना ओळखून शिंदे हे गेल्या सहा वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यात पिकाला पाणी न देता ते पाणी येथील ग्रामस्थांसाठी मोफत देतात. यावर्षी ही  गावातील सर्व विहीरी, बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण  झाली आहे. त्यातच गावात पाण्याचा टॅंकर वेळेत येत नसल्याने गावकर्यांचे पाण्यावाचून हाल होतात. कुठे तरी माणूसकीच्या आणि गावच्या प्रेमा पोटी त्यांनी यावर्षीही आपला बोअर ग्रामस्थांसाठी खुला केला आहे. बोअरला जेमतेम पाणी असल्यामुळे प्रती व्यक्ती 80 लिटर पाणी ते देतात. सर्वांना मिळेल याचीही ते खबरदारी घेतात. शिंदे यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे गावातील अनेक महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे,शिवाय अनेकांच्या कोरड्या घशाची तहाण ही भागली आहे. त्यांचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी व दुष्काळात पालवी फुलवणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com