शरद पवारांच्या हेलिकॉप्टरचे अचानक लँडिंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे आज (रविवार) अचानक लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेर राहिल्याने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत हे लँडिंग करावे लागले.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे आज (रविवार) अचानक लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेर राहिल्याने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत हे लँडिंग झाले. 

अहमदनगर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. कार्यक्रम आटोपून ते पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. लालटाकी येथील रेसिडेन्शिअल महाविद्यालयाच्या मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडवरुन पवार यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. मात्र, हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेर राहिल्याने हे हेलिकॉप्टर सात मिनिटानंतर पुन्हा मैदानाच्या दिशेने आले. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस यंत्रणेला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.  हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर सीटबेल्ट आतमध्ये घेण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरचे दार उघडून पुन्हा बंद करण्यात आले. अखेर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.

Web Title: A sudden landing of Sharad Pawars helicopter