साखर कारखानदारांनी घेतली राजू शेट्टींची भेट

राजकुमार चौगुले
रविवार, 23 डिसेंबर 2018

कोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी जिल्ह्यातील कारखाना प्रतिनिधींनी रविवारी (ता. 23) सकाळी आठ वाजता अचानक भेट देऊन एफआरपी देण्यात येत असलेल्या अडचणीबाबत चर्चा केली. 

साखर कारखानदार 80 : 20 सूत्र देण्यास तयार असल्याचे सांगितले. परंतु खासदार शेट्टी यांनी त्यांच्या प्रस्तावाला नकार देत संघटना एकरकमी एफआरपी वरच ठाम असल्याचा  पुनरुचार केला.

 एफआरपीप्रश्नी  कारखानदारांना भेटणार नसल्याचे श्री शेट्टी यांनी शनिवारी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर कारखानदारांनीच नमते घेत श्री शेट्टी यांचे घर गाठले. परंतु श्री शेट्टी यांनी कारखानदारांना एफआरपी दोन टप्यात देण्याबाबत तडजोड होणार नसल्याचे सांगितल्याने कारखानदारापुढे समस्या वाढल्याचे चित्र आहे.

प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय मंडलिक, गणपतराव पाटील आदींनी श्री शेट्टी यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Sugar factory directors meets Raju Shetty

टॅग्स