कारखान्यांचा "म्हैसाळ' पाणीपट्टीस नकार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची पाणीपट्टी ऊस बिलांतून कपात करून भरण्यास साखर कारखान्यांनी नकार दिला आहे. गेल्यावर्षी सुमारे 4.53 कोटींची पाणीपट्टी कारखान्यांनी भरली होती, मात्र तेथील शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस न पाठवता पर्यायी कारखान्यांची निवड केल्याचे कारखाना व्यवस्थापनाने पाटबंधारे महामंडळाला तक्रारीच्या सुरात कळवले आहे. परिणामी, यावर्षी योजना चालू करण्यातील अडचणी आणखी वाढल्या आहेत. 

गेल्यावर्षी वसंतदादा, महांकाली, माणगंगा, मोहनराव शिंदे, केंपडाव आणि जतचा राजारामबापू कारखाना यांनी एकूण 4.53 कोटींची पाणीपट्टी भरली होती. त्यामुळेच योजना सुरू झाली, मात्र या कारखान्यांना यंदा सिंचन लाभक्षेत्रातील अतिशय कमी ऊस मिळाला, अशी तक्रार आहे. या शेतकऱ्यांनी शिवशक्ती, पंचगंगा, शिरगुप्पी, दत्त अशा पर्यायी कारखान्यांना ऊस पाठवला आहे. त्यामुळे कारखान्यांचे आर्थिक नुकसान होऊन हंगाम अगदी संकटात सापडल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. परिणामी, पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे महामंडळाने बोलावलेल्या दोन्ही बैठकांवर या कारखानदारांनी बहिष्कारच घातला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या आठवड्यात पाणीपट्टी व वीजबिलाबाबत बैठक होत आहे. त्यामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. 24 कोटी 93 लाखांची एकूण थकबाकी आहे. गेल्यावर्षी टंचाई काळात योजना चालवण्यास आलेल्या वीज बिलांतील 33.5 टक्के म्हणजे सुमारे सव्वादोन कोटींची रक्कम शासनाने दिली आहे. मार्च ते जूनपर्यंतच्या टंचाई काळातील बिल मात्र शासनाने दिलेले नाही. ही रक्कम 4 कोटी रुपये होते. ती मिळाली तरी 21 कोटींचा विषय बाकी राहतो. त्याचे नियोजन कसे होणार, हा फार मोठा प्रश्‍न सध्या आहे. त्यात ही योजना भरडली जाण्याची शक्‍यता वाढली आहे. 

कारखान्यांनी भरलेली रक्कम 
* वसंतदादा कारखाना - 1 कोटी 
* महांकाली कारखाना - 1 कोटी 
* मोहनराव शिंदे कारखाना - 1.43 कोटी 
* केंपवाड कारखाना - 50 लाख 
* राजारामबापू जत - 60 लाख 

"म्हैसाळ'चे वीजबिल 
* एकूण थकबाकी - 24 कोटी 93 लाख 
* टंचाई काळातील 33 टक्के मिळाले - 2.25 कोटी 
* मार्च ते जूनचे मिळणे बाकी - 4 कोटी

Web Title: sugar factory water issue