झेले चित्रमंदिरजवळ ऊस परिषद होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

जयसिंगपूर - यंदाचा उसाचा दर ठरविण्यासाठी होणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद येथील झेले चित्रमंदिरलगतच्या मैदानावर होणार आहे. ही परिषद येत्या मंगळवारी (ता. 25) होणार आहे. गेली पंधरा वर्षे विक्रमसिंह मैदानावर होणारी परिषद नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वेळी प्रथमच अन्यत्र होणार आहे.

ऊस परिषदेला खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, दशरथ सावंत, सतीश काकडे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह संघटनेचे नेते उपस्थित राहणार आहेत.

ऊस परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभागात ठिकठिकाणी बैठका घेऊन परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीने गत हंगामात तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता दिवाळीआधी देण्याची मागणी केली आहे. गतवर्षी साखरेचे दर, उसाचे क्षेत्र लक्षात घेऊन संघटनेने 80-20 टक्‍क्‍यांचा फॉर्म्युला मान्य करत आंदोलन मागे घेतले होते. ऊस तुटल्यानंतर 80 टक्के अदा केले असले तरी बहुतांश कारखान्यांनी 20 टक्के उर्वरित रक्कम अद्यापही दिलेली नाही. यामुळे उर्वरित हप्त्याचा मुद्दाही चर्चेत येणार आहे. यंदाचा दर आणि गतवर्षीचे 20 टक्के दिल्याशिवाय कारखाने सुरू करू न देण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. खासदार शेट्टी यांनीही ठिकठिकाणच्या कार्यक्रमात यावर्षी अपेक्षित दर दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा दिला आहे. दिवाळीनंतरच या प्रश्‍नी कारखानदारांकडून चर्चा होणार आहे.

'सकाळ'चे अचूक वृत्त
आचारसंहितेमुळे यंदा ऊस परिषदेचे ठिकाण पंधरा वर्षानंतर प्रथमच बदलणार असे वृत्त काल फक्त "सकाळ'नेच प्रसिद्ध केले होते. हे वृत्त अचूक ठरले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज अपेक्षेप्रमाणे परिषदेचे ठिकाण बदलले.

Web Title: sugarcane conferance near zele theater

टॅग्स