उसाचा फड पुन्हा पेटणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

सोलापूर - येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणाऱ्या यंदाच्या गाळप हंगामात उसाचा पायाभूत उतारा ९.५ ऐवजी किमान १० टक्‍के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. महाराष्ट्र राज्याच्या उसाच्या उताऱ्यानुसार कारखानदारांना आता प्रतिटन उसाला २ हजार ६३७ रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, त्यासाठी सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात ठोस मदत मिळाल्याशिवाय वाढीव ‘एफआरपी’ शक्‍य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा शेतकरी संघटनाविरुद्ध सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. 

यावर्षी ९३२ लाख मे.टन उसाच्या गाळपातून सुमारे २०७ लाख मे.टन साखर उत्पादित होईल. मात्र, मागील वर्षीची शिल्लक साखर आणि आगामी उत्पादनामुळे शिल्लक साखरेचा प्रश्‍न उद्‌भवण्याची शक्‍यता  वर्तविली जात आहे.

इथेनॉलचा दर ५० रुपये करावा, साखर निर्यातीचे अनुदान दुप्पट व निर्यातीचा कोटा १५ टक्‍के बंधनकारक करावा, साखरेला ३२०० रुपये दर हवा, त्याशिवाय वाढीव एफआरपी देणे शक्‍य नाही.
- उमेश परिचारक, युटोपियन शुगर, पंढरपूर

केंद्र सरकारने ठरविल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आगामी गाळप हंगामात साखर कारखानदारांना वाढीव एफआरपी द्यावीच लागेल. अन्यथा कारखानदारांविरोधात आंदोलन केले जाईल.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Sugarcane Crushing season