ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकजूट झाली पाहिजे 

हुकूम मुलाणी
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - दुध उत्पादकाप्रमाणे ऊसाला चांगला दर मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकजूट झाल्याशिवाय कारखानदारांची दरोडेखोरी थांबणार नाही असे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तालुक्यातील अरळी येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष समाधान फाटे मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. राहुल घुले तालुकाध्यक्ष अनिल बिराजदार श्रीनिवास भोसले, रणजित बागल शंकर संघशेटटी आकाश दोषी, प्रकाश भांजे, रतनसिंह रजपूत, मल्लिकार्जुन भांजे, शांताप्पा कुंभार, भरत चव्हाण, तात्या सोपवार, आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष तुपकर म्हणाले, खासदार राजू शेटटी यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढीचे आंदोलन केले. त्याला दुधउत्पादकांनी साथ दिल्यामुळे दर वाढ झाली. सत्ताधारी भाजपाने सत्तेत येण्यापुर्वी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत ती न पाळल्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली. मराठा व धनगर समाजाला आरक्षणाची गरज असून, त्यांना आरक्षण देणे गरजेचे असून त्यावर लवकरच तोडगा निघणे आवश्यक आहे. गतवर्षी ऊस गाळपापुर्वी प्रतिटनाला एफ आर. पी. पेक्षा दोनसे रु. अधिक दर देण्याचे सहकारमंत्री सांगूनही एफ. आर. पी. रक्कम अदा केली नाही. एफ. आर. पी. रक्कम कारखानदारकडून वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. सुत्रसंचालन लक्ष्मण जमदाडे यांनी तर आभार नवनाथ माने यांनी मानले

Web Title: Sugarcane growers should be united