कोल्हापूर, सांगलीत पावसामुळे ऊसतोड थंडावली

कोल्हापूर, सांगलीत पावसामुळे ऊसतोड थंडावली

कोल्हापूर -  रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. आजही ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे कोल्हापूर सांगलीतील ऊसतोड थंडावली आहे. चिखल तसेच अद्यापही ढगाळ व तुरळक पाऊस सुरू असल्याने ऊस तोड करणे शक्य होणार नाही. चिखलामुळे गाड्या रुतण्याचीही शक्यता असते.

पावसामुळे आठ दिवस गुऱ्हाळघरे बंद राहण्याची शक्यता आहे. जळवाण पावसात भिजल्याने ते वाळण्यास कमीत कमी आठ दिवस तरी लागतात. तसेच पावसामुळे चिखल झाल्याने ऊस तोड करणेही शक्य होणार नाही. 

बाबासाहेब पाटील, वडणगे

गुऱ्हाळघरावर मात्र पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. उन्हात वाळत घातलेली चिपाडे भिजल्याने चुलवान कसे पेटवायचे हा प्रश्न गुळ उत्पादक शेतकऱ्यांसमोर पडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com