#SugarcaneRateIssue सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन चिघळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊस वाहतूक रोखली. वाहतूक करणाऱ्या वाहनांची टायर पेटवले. कारखाने बंद करण्याचा इशारा देऊनही कारखाने सुरूच ठेवल्याने आंदोलन चिघळले 

काल रात्री इस्लामपूर येथील कामेरी गावात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस जाळल्याची घटना घडली आहे. तसेच आष्टा आणि मिरज तालुक्यातही टायर जाळल्याचे प्रकार घडले आहेत. वड्डीमध्ये ट्रॅक्टर जाळण्यात आले. एकंदरीतच जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलन पेटले आहे. दोन ट्रॅक्टर आणि कारखान्याचे ऑफिस जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केले आहे..

उसाला पहिली उचल एफ आय पी अधिक दोनशे रूपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस आंदोलन तीव्र केले आहे. काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागले अनोळखी व्यक्तींनी कामेरी येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय पेटवून दिले  हे कार्यालय राष्ट्रीय महामार्गावर आहे  दरवाज्यावर राँकेल ओतले. कागदपत्रे पेटवली. आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. 

दरम्यान दोन दिवसापूर्वी तांदुळवाडीजवळ उसाच्या ट्राँलीचे टायर पेटविण्यात आले होते. रविवारी (ता 11) चक्का जाम  आंदोलन केले जाणार आहे. जो पर्यत उसाला योग्य  भाव  मिळत नाही तोपर्यंत कारखान्याला ऊस घालू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका उपाध्यक्ष काशिनाथ  निंबाळकर व युवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील  पाटील यांनी केले आहे.

Web Title: sugarcane rate issue agitation in Sangli District

टॅग्स