ऊस दरावरून स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

सांगली - ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. उसाला 2300 रुपये पहिली उचल दिल्यामुळे काल रात्री रेठरेहरणाक्ष येथील कृष्णा साखर कारखान्याचे गेटकेन ऑफिस पेटवून दिले आहे.

सांगली - ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. उसाला 2300 रुपये पहिली उचल दिल्यामुळे काल रात्री रेठरेहरणाक्ष येथील कृष्णा साखर कारखान्याचे गेटकेन ऑफिस पेटवून दिले आहे.

एक रकमी एफआरपी द्यावी 2300 रुपये पहिली उचल नको. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहे. पण पहिली उचल २३०० दिली गेल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलनचा बडगा उचलला आहे. काल रात्री कृष्णा साखर कारखानाचे रेठरेहरणाक्ष येथील ऑफिस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेटवले आहे. 

लवकरात लवकर उसाचा तिढा भाजप सरकारने सोडवावा अन्यथा भाजपचे अमित शहा हे सांगली कोल्हापूरला येणार आहेत. त्यांना या जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी  दिला आहे.

Web Title: Sugarcane Rate Issue Swabhimani Farmers Organisation agitation in Sangli

टॅग्स