हंगामाच्या सुरवातीलाच शिराळा पश्‍चिम भागात उसाला तुरे

sugarcane season start earlier in shirala western area in sangli
sugarcane season start earlier in shirala western area in sangli

कोकरूड (सांगली) : ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत तळ ठोकून बसलेल्या परतीच्या पावसामुळे यंदा गळीत हंगाम थोडासा लांबणीवर पडला. शिराळा पश्‍चिम भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस तोडणीस सुरवात झाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये उसाला दिसणारे तुरे हंगामाच्या सुरवातीलाच दिसू लागले आहेत. शिराळा पश्‍चिम भाग तसा ऊस पिकाचा आगार बारमाही वाहत असलेल्या वारणेमुळे शेतकरी उसास अधिक महत्व देतो. मात्र दोन वर्ष पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

महापुराने तर गत वर्षी परतीच्या पावसाने भात व उसाची पडझड झाली. त्याचा फटका साहजिकच शेतकऱ्यांला बसला. मार्चपासून कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी परतीच्या पावसाने नुकसानीला सामोरे जात असताना वेळोवेळी होणाऱ्या वातावरणातील बदलाने उसाला तुरे फुटल्यामुळे आणखीनच अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. आधीच हुमणी किडीच्या तडाख्यातून वाचलेले ऊस पीक अवकाळी पावसाने काही ठिकाणी ऊस भुईसपाट झाले. या उसाला फुटवे फुटलेत. 

उसाच्या उत्पादनाबरोबर वजनात घट होणार हे अटळ आहे. तुरे फुटल्याने ऊस पोकळ बनून दशी पडल्यामुळे देखील वजन कमी होणार आहे. या भागात 86032, 9208, 9205, 10001, 3201, सिद्धगिरी जातीच्या उसपीकाच्या वाणांची लागणीसाठी निवड करतात. त्यापैकी काही वाणांना ठराविक दिवसानंतर तुरे पडतात. यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच तुरे दिसू लागल्यामुळे शेतकरी ऊस लवकर तोड करून कारखान्यास पाठवण्याच्या धडपडीत आहे. 

कारखान्यांनी दखल घ्यावी 

यावर्षी सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त राहिले. उसाला पोषक असे वातावरण मिळाले नाही. त्याचा परिणाम ऊस पिकावर होऊन तुऱ्याच्या वाढीवर झाला. तुरे फुटलेल्या व पावसामुळे कोलमडून पडलेल्या उसाची कारखान्यांनी दखल घेऊन तोड करून शेतकऱ्यांला दिलासा द्यावा. 

"शिराळा तालुक्‍यात 8 हजार 145 हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. 75 टक्के ऊसास तुरे फुटलेत. सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहिले. 15 ऑक्‍टोबरनंतर पडलेल्या परतीच्या पावसामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण जास्त राहिले. उसास लागणारी पोषक द्रव्याचे प्रमाण कमी पडले. वेळोवेळी होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम तुरे फुटण्यास कारणीभूत ठरला. तुरे फुटल्यामुळे उसात पक्वता येते. वाढदेखील थांबते."

- जी. एस. पाटील, तालुका कृषी अधिकारी, शिराळा  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com