ऊसतोड वाहतुकीचे पैसे परत न मिळाल्याने उपोषण

अण्णा काळे
बुधवार, 4 जुलै 2018

सुनिल नेटके हे ऊस वाहतुकदार मस्के यांना जामीनदार आहेत.ऊस वाहतुकदार मस्के यांनी केलेल्या करारानुसार पैसे न भरल्याने जामीनदार म्हणुन त्यांचे पैसे कापून घेतले आहेत. त्यांचा ट्रक आम्ही आणला नाही तर त्यांनीच आणुन लावला असुन तो घेऊन जाण्यास सांगितले आहे. 
- दिग्विजय बागल, अध्यक्ष मकाई सह. साखर कारखाना.

करमाळा : श्री. मकाई सह. साखर कारखाना भिलारवाडी(ता.करमाळा) या साखर कारखान्यांना २०११-१२ चे ऊसतोड वाहतुकीचे १ लाख १७ हजार रुपये जामिनात कपात केलेले पैसे अजुनही परत केले नाहीत, ते पैसे तातडीने मिळावेत यासाठी फिसरे येथील सुनिल भिमराव नेटके यांनी करमाळा तहसिल कार्यालयासमोर सोमवार २ जुलैपासुन सुरू केलेले उपोषण तिस-या दिवशीही सुरूच आहे. 

याबाबत श्री. नेटके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मकाई साखर कारखान्याने २०११-१२ साली माझ्या ऊसतोड वाहतुकीचे पैसे मी वसंत साधु म्हसके (रा.वरकुटे) यांची ट्रक ऊसतोड वाहतुकीसाठी करार केला होता, त्याला मी जामिनदार होतो, तो ट्रक २०११-१२ हंगाम होण्यापूर्वीच त्याच्यावर बाकी शिल्लक राहील अशा धोरणाने कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या आदेशाने ट्रक कारखान्याने ताब्यात घेतली, मी जामिनदार म्हणून त्यांनी माझे १ लाख १७ हजार रुपये ऊसतोड वाहतुकीचे पैसे दिले नाही. कारखान्याने ट्रकही ताब्यात घेतला व माझे पैसेही दिले नाहीत.त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कारखान्याचे अधिकारी उपोषण कर्ते नेटके यांच्याशी बोलणी करत आहेत. 

सुनिल नेटके हे ऊस वाहतुकदार मस्के यांना जामीनदार आहेत.ऊस वाहतुकदार मस्के यांनी केलेल्या करारानुसार पैसे न भरल्याने जामीनदार म्हणुन त्यांचे पैसे कापून घेतले आहेत. त्यांचा ट्रक आम्ही आणला नाही तर त्यांनीच आणुन लावला असुन तो घेऊन जाण्यास सांगितले आहे. 
- दिग्विजय बागल, अध्यक्ष मकाई सह. साखर कारखाना.

Web Title: sugarcane transporter fast in Karmala

टॅग्स