पूरग्रस्त जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गुणवत्तापूर्वक, माफक किंमतीत करण्याची सुचना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

आस्थापनांना पूरग्रस्त जनतेला शुध्द व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या पाण्याचा पुरवठा हा किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.

सांगली - अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक 9 व 10 ऑगस्ट रोजी सांगली येथील 6 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांना पूरग्रस्त जनतेला शुध्द व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या पाण्याचा पुरवठा हा किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे जैन फिल्टर वॉटर सप्लायर्स, एस. टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली, चैतन फिल्टर वॉटर सप्लायर्स, 100 फूटी रोड, अवधूत कॉम्प्लेक्स, सांगली, टाटा फिल्टर वॉटर सप्लायर्स, 100 फूटी रोड, चेतना पेट्रोल पंपच्या बाजूला, सांगली, श्रीशा वॉटर सप्लायर्स, हॉटेल पै प्रकाशच्या मागे, अमृत पेय जल, विश्रामबाग, कृषी उत्पन्न बाजार समिती वॉटर फिल्टर सप्लायर्स, मार्केट यार्ड सांगली या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा माफक किंमतीत व गुणवत्तापूर्वक असा करण्याचे आवाहन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suggestion to provide drinking water quality and at reasonable cost to the flood affected people