सिध्दापूर वीज उपकेंद्राचे काम प्राधान्याने करण्याच्या सुचना

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकाडून वीजेची मागणी वाढली असून, यासाठी प्रास्तावित रखडलेली वीज उपकेंद्रे आणि वीज ग्राहकाच्या प्रश्नांबाबत मुंबईतील प्रकाशगड येथील प्रकल्प संचालक दिनेश साबू, यांच्या समवेत प्रशांत परिचारक यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यात सिध्दापूर उपकेंद्राचे काम प्राधान्याने करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तर नवीन उपकेंद्र प्रास्तावित करावीत नसेल तर जवळच्या उपकेंद्राची क्षमता वाढवून वीजेचा पुरवठा पुर्ण दाबाने सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या.

या बैठकीस शिवानंद पाटील, बापुराव चौगुले, गंगाधर काकणकी, सुधाकर पाटील,
नानासो मलगोंडे, निगय्या स्वामी, शंकर संघशेट्टी, विठ्ठल येणपे, प्रकाश भिंगे, महादेव भोजणे आदी उपस्थित होते. या बैठकीत सिध्दापूर या नदीकाठच्या भागातील वीजेची मागणी जास्त असल्याने नवीन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याच्या सुचना दिल्या.

डोणज, नंदुर, शिरसी, गोणेवाडी या परिसरातील वीजेच्या मागणीचा विचार करून दोन उपकेंद्राचे प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सुचना दिल्या. तर तळसंगी येथील उपकेंद्राचे काम मंजूर असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे अधिकाय्रानी सांगितले. बोराळे व हुलजंती उपकेंद्राचा वाढीव भार देता येत असेल क्षमता वाढविण्याची मागणी करण्यात आली. भाळवणी 132 के.व्ही केंद्रात सध्या एका लाईनने वीजपुरवठा सुरू असून अर्धवट लाईनचे काम पुर्ण करून दोन महिन्यात हे केंद्र पुर्ण क्षमतेने चालविणार असल्याचे यावेळी सांगितले.

जादा भारामुळे डीपी जळण्याचे प्रमाण जास्त असल्याने जादा क्षमतेचे डीपी बसविणे. जुन्या जीर्ण झालेल्या लाईन बदलणे, केबल, कट आऊट नवीन देणे, महावितरण आपल्या दारी योजनेतील लाभाऱ्याला वीज जोड देणे.  एच.व्हि.डी.एस. योजनेस गती देणे, शेतकऱयांना प्रलंबित वीज जोडणी वेळेत देणे इन्फ्रा 2 ची अर्धवट कामे पुर्ण करणे. मागणी प्रमाणे लागणारे विजेचे साहित्य त्या त्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून देण्याची सुचना अधिकाऱ्याला केली.

Web Title: Suggestions for prioritizing the work of Siphapur sub-center