सावकार हरीश स्वामीचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

कोल्हापूर - कर्जाच्या वसुलीबरोबर अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणातील मुख्य संशयित सावकार हरीश स्वामीने आज विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सीपीआरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

कोल्हापूर - कर्जाच्या वसुलीबरोबर अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणातील मुख्य संशयित सावकार हरीश स्वामीने आज विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सीपीआरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून त्याचे साथीदार सद्दाम ऊर्फ आसिफ सत्तार मुल्ला (वय २९, रा. यादवनगर) आणि आशीष शिवाजी पाटील (२८, रा. अंबाई डिफेन्स कॉलनी) या दोघांना अटक केली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - बलात्कारप्रकरणी पीडित नवविवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयित हरीश स्वामी, सद्दाम मुल्ला, आशीष पाटीलवर गुन्हा दाखल झाला; तेव्हापासून तिघे पसार झाले होते. त्यांचा शोध शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. दरम्यान, सायंकाळी हरीश स्वामी (वय २०, रा. विद्या कॉलनी) याने टाकाळा येथील कॅफेजवळ विष घेतले. त्यानंतर त्याने त्याची माहिती दूरध्वनीवरून मित्रांना दिली.

मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्याला रिक्षातून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत फौजफाट्यासह दाखल झाले. नातेवाइकांनी तेथून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. सीपीआरमधून रुग्णवाहिकेत नेत असताना त्याच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने त्याला घेराओ घालत प्रसारमाध्यमापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, या प्रकरणातील संशयित सद्दाम मुल्ला व आशिष पाटील दोघे सायबर चौकात नातेवाइकांकडून पैसे घ्यायला येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक संजय मोरे व त्यांच्या पथकाने येथे सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची दीर्घकाळ चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्या दोघांना अटक केली.

ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक शीलप्रभा पाटील, सहायक फौजदार संदीप जाधव, कर्मचारी तानाजी चौगुले, सागर माळवे, प्रशांत घोलप, विजय चौगुले, दिग्विजय पाटील, विजय इंगळे, अजय नाईक, तौसिफ मुल्ला, नारायण कोरवी यांनी केली. दरम्यान, पीडित फिर्यादी याची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: suicide attempt by Harish Swami