उकळत्या काहिलीत कामगाराने घेतली उडी (व्हिडिआे)

उकळत्या काहिलीत कामगाराने घेतली उडी (व्हिडिआे)

कोल्हापूर - गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, ता. करवीर)  असे त्याचे नाव आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे आज सकाळी ही घटना घडली. त्याच्यावर सीपीआर येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, गौतम कांबळे हा ऑक्टोबरपासून कसबा वाळवे येथील सचिन शिवाजी पाटील यांच्या गुऱ्हाळ घरामध्ये कामाला करतो. गुऱ्हाळ घरातील चुलीमध्ये वाळलेले चिप्पाडे टाकण्याचे काम तो करत होता. आज सकाळी गौतम याने अचानक उकळत्या काहीलीत उडी घेतली. गुऱ्हाळ घरातील दुसरा कामगार रघुनाथ वाळवेकर यांनी हा प्रकार पाहून आरडा ओरड सुरू केली .मात्र काहिल उकळती असल्याने बराच वेळ कोणाला काही करता आले नाही. या घटनेत गौतम 95 टक्के भाजला आहे. कामगारांनी त्याला तातडीने सीपीआर येथे दाखल केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com