पलूसला तरुणाने हाताची नस ब्लेडने कापून घेतली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पलूस - येथे काल दुपारी बाराच्या सुमारास मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू असताना राजेंद्र धनराज देसाई (वय ४५) याने ब्लेडने हाताची नस कापून  घेतली. त्यांना उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.

येथे जुन्या बसस्थानक चौकात तासगाव- कऱ्हाड रस्त्यावर 
मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना देसाई याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत डाव्या हाताची नस ब्लेडने कापली. हातातून रक्तस्राव सुरू झाला. कार्यकर्त्यांनी तत्काळ त्याला  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

दरम्यान, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, शेतकऱ्यांना न्याय देत नाही, तरुणांना रोजगाराची संधी उपल्ब्ध करत नाही, मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करते आहे म्हणून नस कापून घेतल्याचे देसाई याने सांगितले. देसाई एका खासगी कारखान्यात नोकरी करतात. त्यांना थोडी शेतीही आहे.

सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा अशा घटना वारंवार घडत राहणार. मराठ्यांचा संयम सुटण्याची वाट पाहू नये.
- बापूसाहेब येसुगडे, 

माजी सभापती जि. प. सांगली

Web Title: Suicide attempt of Youth in Palus