सांगलीवाडीतील एकाची कृष्णा नदीत आत्महत्या

सांगलीवाडीतील एकाची कृष्णा नदीत आत्महत्या

सांगली : सांगलीवाडीतील राजू तुकाराम पवार (45, रा. सुतार प्लॅट, ज्योतीबा मंदिराजव) यांनी कृष्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केली. सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह सांगलीवाडीजवळ नदीत आढळून आला.

शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

अधिक माहिती अशी, की राजू पवार हे सांगलीवाडी टोलनाक्‍याजवळील एका बारमध्ये काम करत होते. काल कामावरून ते घरी आले. पहाटे चारच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेले. दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास सांगलीवाडी स्मशानभूमीसमोर नदीत मृतदेह तरंगत असल्याचे नागरीकांनी पाहिले.

त्यानंतर शहर पोलिसांनी धाव घेतली.पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ओळख पटली. उपनिरीक्षक गणेश शिंदे, निवास कांबळे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com