Thur, June 1, 2023

योगेशनं लाकडी तुळईला दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
Crime News : धक्कादायक! मध्यरात्री स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Published on : 21 March 2023, 7:56 am
वाळवा : येथील एका तरुण फळ विक्रेत्यानं काल मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.
येथील बाराबिगा वसाहतीतील गल्ली क्रमांक दोनमध्ये आज सकाळी ही घटना उघडकीस आली. योगेश सचिन फाळके तथा मालेवाडीकर (वय 24) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.
या प्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मयत योगेश यानं आत्महत्येआधी स्वतःच्या मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीसह नोटांच्या बंडलाचे फोटो डीपीवर सेव्ह केले होते.
योगेशच्या काही मित्रांनी तो डीपी प्रोफाईल पाहिल्यावर सकाळी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तेव्हा योगेशनं लाकडी तुळईला दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.