मंगळवेढ्यात ऊस तोडणी कामगाराची गळफास लावून आत्महत्या

हुकूम मुलाणी
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मंगळवेढा - तालुक्यातील निंबोणी येथे अज्ञात कारणावरून ऊस तोडणी कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या या प्रकाराने तालुक्याच्या दक्षिण भागात खळबळ उडाली.

सोमलिंग उर्फ बाळू नामदेव देवकते वय 35 असे मृत व्यक्तिचे नाव असून, काल रात्री ही आत्महत्या केली आहे. सकाळी हा प्रकार उजेडात आला. देवकते यांच्या पहिल्या पत्नीचा यापुर्वी विहीरीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला असून, त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दक्षिण भागात दुष्काळाची मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने या भागातील मजुरांना रोजगार साधन नसल्यामुळे ऊसतोडणी शिवाय पर्याय नाही. उसतोडणीसाठी मजुराला देण्यात येणारी उचल आणि प्रत्यक्ष कामावर येण्याच्या मजुराची मानसिकता यात मुकादम व मजुर यांच्यात बऱ्याचवेळा वादाचे व फसवणूकीचे प्रकार होत असतात. आत्महत्येच्या प्रकाराबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Suicide of sugarcane worker in mangalwedha