एकाच घरातील तिघांची गळफास लावून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पांडूरंग राधू शेळके (वय 31), पत्नी सोनाली शेळके (वय 22) तर मुलगी शिवन्या अशी मृतांची नावे आहेत. या दाम्पत्याने आपल्या मुलीसह गळफास घेतला आहे. ही घटना काल (ता.22) रात्री उघडकीस आली.

नगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चास गावातील एकाच घरातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. नवरा बायकोने आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह जिवन संपवले आहे. 

पांडूरंग राधू शेळके (वय 31), पत्नी सोनाली शेळके (वय 22) तर मुलगी शिवन्या अशी मृतांची नावे आहेत. या दाम्पत्याने आपल्या मुलीसह गळफास घेतला आहे. ही घटना काल (ता.22) रात्री उघडकीस आली.

आत्महत्येमागील निश्चित कारण अजून समोर आलेले नाही, परंतु, कर्जबाजारीपणाच्या तणावातून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज सांगण्यात येत आहे. अकोलेच्या रूग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अकोले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिस पुढील तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Suicide by three people in a single house