मरणाने केली सुटका... बायको, मेहुणीने छळलं होतं...

suisice in shrigonda
suisice in shrigonda

श्रीगोंदे: पती व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना अजूनही काही कमी होत नाही. कारणे भलेही काहीही असोत घटनेची परिणती तीच असते. मात्र, श्रीगोंदा तालुक्यात घडलंय उलटंच. सासुरवाडीकडूनच त्याला सासरवास व्हायचा, मेहुणीही त्याला जाच करायची. बायकोही त्यांना सामील होती.

या सगळ्याला वैतागलेल्या तरूणाने शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करला.तालुक्यातील येळपणे येथे ही घटना घडली. 

या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी पत्नीसह पाच जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपींना ताब्यातही घेतले आहे. अमोल चंद्रकांत शिंदे याने आपल्या पत्नीच्या व सासुरवाडीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. पत्नी, मेहुणी, सासू-सासरऱ्यांविरूद्ध त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यामुळे हा प्रकार उडकीस आला. 


या प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी काजल, सासरे दादा दत्तु मेटे, सासु निर्मला दादा मेटे (दोघेही आढळगाव), मेव्हुणी सोनी सुदाम गायकवाड (थेरगाव ता. कर्जत) तसेच रुक्मिणी संतोष जाधव चोराचीवाडी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपुर्वी मयत अमोल व काजल यांचा विवाह झाला. अमोल व्यवसायानिमित्त सुरतला होता. मात्र, आरोपी त्याला संगनमताने मानसिक छळ करुन अपमानास्पद वागणूक देत होते. यात्रेनिमित्त तो गावाकडे आल्यानंतर त्याला असाच छळ झाला. तो असह्य झाल्याने अमोल याने 23 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने या बाबत लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे पोलिसांनी आज आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com