तरुण व्यापाऱ्याने लॉजमध्ये केली आत्महत्या! कारण.. 

सकाळ वृत्तसेवा
12.21 AM

पुण्यातून आल्याचे सांगून आदित्य हा हिरामोती लॉजमध्ये रूम नंबर 102 मध्ये मुक्कामी होता. दार उघडून पाहिल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

सोलापूर : नवी वेस पोलिस चौकी परिसरातील हिरामोती लॉजमध्ये तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 4) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. कपड्याचे दुकान व्यवस्थित चालत नसल्याच्या तणावातून तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : पॅनकार्ड काढायचे आहे, तर कशी आहे प्रक्रिया.. 

मंगळवारपासून होता बेपत्ता 
आदित्य बाळकृष्ण बंकापूर (वय 22, रा. गुरुवार पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य हा मंगळवारी घरातून बाहेर पडला होता. तेव्हापासून त्याचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. शहरात विविध ठिकाणी शोध घेत बंकापूर कुटुंबीय बुधवारी सकाळी 11 वाजता हिरामोती लॉजवर पोचले. नाव आणि छायाचित्राच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात आली. 

हेही वाचा : कुभेजफाटा येथे अपघात; पत्नी ठार, पती बचावला

चाटीगल्लीत कपड्याचे दुकान 
पुण्यातून आल्याचे सांगून आदित्य हा हिरामोती लॉजमध्ये रूम नंबर 102 मध्ये मुक्कामी होता. दार उघडून पाहिल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आदित्य याचे चाटी गल्लीत कपड्याचे दुकान आहे. ते दुकान व्यवस्थित चालत नव्हते. त्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसांत झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suicide of a young businessman