तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळाचा पहिला बळी

Farmar
Farmar

मंगळवेढा : तालुक्यातील यंदाच्या हंगामात दुष्काळी दाहकता जाणवू लागली  हातातील पिके वाया गेल्यामुळे पडोळकरवाडी येथील किसन नामदेव लांडगे (वय 35) या अविवाहित तरुणाने नंदेश्‍वरातील महादेव दोलतडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला तालुक्यातील या दुष्काळातील पहिला बळी ठरला. दिवाळी सणात याने आत्महत्या केल्यामुळे पडोळकरवाडी गावावर शोककळा पसरली.

या घटनेची हकीकत अशी की, मयत किसन लांडगे या मनात दुष्काळ पडल्यामुळे व शेतातील पिके वाया गेल्यामुळे नैराश्य पसरल्याने मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे बोलून दाखवत होता. नंदेश्‍वरातील बहिणीकडे गेला असता सकाळी प्रात:विधी बहिणीची सासू जात असताना ओढयातील लिंबाच्या झाडास त्यांने गळफास घेतल्याचे दिसून आले.

आप्पासाहेब दौलतडे यांनी या घटनेची खबर मयताच्या वडीलांना फोनवरुन सांगितली दुष्काळी गावात आता ही तिसरी आत्महत्या असून आणखी आत्महत्येची प्रतिक्षा न प्रशासनाने दौऱ्यापेक्षा ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे. या घटनेची पोलीस फिर्याद दाखल झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com