युवतीची गळफास लावून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

कृष्णानगर येथील आदित्यनगरीत राहणाऱया युवतीने आज सकाळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. किरण दशरथ संकपाळ (वय 27) असे तिचे नाव आहे.
 

सातारा- कृष्णानगर येथील आदित्यनगरीत राहणाऱया युवतीने आज सकाळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. किरण दशरथ संकपाळ (वय 27) असे तिचे नाव आहे.

कॉम्युटरचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर ती एका खासगी कंपनीत नोकरीला लागली होती. आज सकाळी तिची आई बाहेर गेली होती. ती घरी परतल्यावर किरणने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरणच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आहे.

Web Title: Suicide by young woman