'ईडीसाठी बाळासाहेबांचा दरवाजा सदैव उघडा'

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

सोलापूर  : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधी बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखविली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली. राज ठाकरे यांची सुनावणीही पार पडली. मात्र, ऍड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर हे लोकशाही वाचविण्यासाठी कायम सरकारविरोधी भूमिका घेतील. ईडीसाठी ऍड. बाळासाहेबांचा दरवाजा सदैव उघडाच असेल, असे आव्हान ऍड. आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकरांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिले.

वंचित बहूजन आघाडीला सत्ता मिळाल्यास राज्यातील पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत असेल, कोयना धरणातून समुद्रात जाणारे पाणी उजनीत आणून मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिले जाईल आणि ओबीसीची जनगणना करुन या संवर्गातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल असा जाहीरनामा असेल, असेही सुजात आंबेडकरांनी या वेळी सांगितले. दरम्यान, हा चुनावी जुमला नसून वचननामा असेल आणि तो समाजातील वंचित घटकांसाठीचा आहे.

2014 च्या निवडणुकीत शिवसेना- भाजपने प्रसिध्द केलेल्या वचननाम्यानुसार हमीभाव मिळाला नाही, शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत तर दोन कोटी रोजगार दूरच होते तेही रोजगार गेले, असा आरोपही त्यांनी केला. वर्षानुवर्षे सत्ता, शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्यांना न्याय हवा आहे आणि त्यासाठी सोलापुरातील आनंद चंदनशिवे यांच्यासह सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

एमआयएमच्या दोन उमेदवारांना 'वंचित'चा पाठिंबा 
भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि अकोल्यातील एमआयएमच्या उमेदवाराला वंचित बहूजन आघाडीने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. वंचित बहूजन आघाडीसमवेतची युती इम्तियाज जलिल यांनी तोडली. जलिल यांनी युतीचा बंद केलेला दरवाजा स्वत:हून उघडावा, असेही सुजात आंबेडकरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com