मिरज : पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या भंडारे

काँग्रेसच्या सुवर्णा कोरे यांचा एक मतांनी पराभव : अटीतटीने झाली निवडणूक
miraj
mirajsakal

मिरज : येथील पंचायत समितीच्या(panchayat samiti) सभापतिपदी भाजपच्या सुमन शिवाजी भंडारे (नरवाड) यांची बहुमताने निवड झाली.त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सुवर्णा बाळासाहेब कोरे (बेळंकी) यांचा एका मताने पराभव केला. अत्यंत अटीतटीने झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या दोघी महिला सदस्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार सुवर्णा कोरे(candidate suvrna kore) यांच्या बाजूने मतदान केले तर कॉंग्रेसच्या सदस्या पूनम महेश कोळी यांनी भाजपच्या उमेदवार सुमन भंडारे यांच्या बाजूने मतदान केले.

miraj
मुंबईत 14 कोटींचं चरस जप्त; तस्करीचं काश्मीर कनेक्शन

एकूण २२ सदस्य संख्या असलेल्या मिरज पंचायत समितीमध्ये अजयसिंह चव्हाण (डिग्रज) आणि रंगराव जाधव (सोनी) या दोन सदस्यांचे निधन झाले आहे. आणि विक्रम पाटील (बुधगाव) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पंचायत समिती मधील तीन पदे रिक्त आहेत. माजी सभापती गीताजंली कणसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या सभापतिपदाच्या पदाची ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि प्रतिस्पर्धी महाआघाडीच्या सदस्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची ठरवली.

miraj
सोलापूर विद्यापीठाची 24 जानेवारीपासून ऑनलाइन परीक्षा!

चार महिन्यांपूर्वी झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या(bjp paschim maharashtra) किरण बंडगर यांचा अनिल आमटवणे यांनी पराभव केला. यावेळी भाजपतील शुभांगी प्रदिप सावंत आणि सुनिता सिद्धोबा पाटील या सदस्यांनी अनिल आमटवणे यांच्या बाजूने मतदान केल्यामुळे पंचायत समितीचे उपसभापतीपद भाजपला गमावावे लागले. त्यानंतर पंचायत समितीमध्ये भाजप आणि विरोधी महाआघाडीच्या(mahavikasaghadi) सदस्यांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू झाली. याच दरम्यान सभापती गीताजंली कणसे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त पदासाठीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकरी संघटना आणि भाजपने जोरदार तयारी सुरू केली. एकोणीस सदस्यांच्या उपस्थित ही निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डी एस कुंभार यांनी काम पाहिले. निवडणुकीतील विजयानंतर नुतन सभापती सुमान भंडारे यांचे खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे(mla suresh khade) यांनी अभिनंदन केले.तर समर्थकांनी पंचायत समिती समोर जोरदार जल्लोष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com