कोल्हापूर महापाैरपदासाठी ॲड. लाटकर, गवंडी यांच्या नावाची चर्चा

कोल्हापूर महापाैरपदासाठी ॲड. लाटकर, गवंडी यांच्या नावाची चर्चा

कोल्हापूर - महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत संपल्याने उद्या (ता. १९) होणाऱ्या सभेत त्या पदाचा राजीनामा देणार आहेत. उपमहापौर भूपाल शेटे यांना मात्र आणखी सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. नव्या महापौरपदासाठी राष्ट्रवादीतून हालचाली वाढल्या आहेत. या पदासाठी सूरमंजिरी लाटकर यांचे नाव आघाडीवर आहे. माधुरी गवंडी यांच्याही नावाची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीची आणि आगामी विधानसभा निवडणुकीची किनार महापौर निवडीच्या हालचालींना असणार आहे. 

नोंव्हेबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला २९, राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. ताराराणी आघाडीला १९, भाजपला १३, तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. महापालिकेवर दोन्ही काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता मिळविली आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये ठरलेल्या तडजोडीनुसार वर्षासाठी महापौरपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. यापैकी सहा महिने सरिता मोरे यांना संधी मिळाली. सहा महिन्यांपूर्वी लाटकर आणि मोरे यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली होती. त्यातून मोरे यांचे नाव निश्‍चित केले होते. त्याचवेळी सहा महिन्यांचा फॉर्म्युला ठरला होता. आता सहा महिने पूर्ण झाले आहेत.

आणखी सहा महिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला हे पद येणार आहे. त्यामुळे आता सूरमंजिरी लाटकर यांना संधी दिली जाणार आहे. लाटकर या माजी स्थायी समिती सभापती, तसेच राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादीच्या १५ जागांपैकी दोघांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. तेथेच आता पोटनिवडणूक होत असून, यापैकी एका जागेवर राष्ट्रवादीने उमेदवारही उभा केलेला नाही.

त्याचबरोबर नगरसेविका शमा मुल्ला अटकेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या तीन जागांना फटका बसला आहे. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने काही जणांवर टांगती तलवार आहे. शासनाने निवडणुकीच्या तोंडावर जर काही निर्णय घेतले तर मात्र दोन्ही काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेचे चार नगरसेवक दोन्ही काँग्रेसच्या पारड्यात असतात, ही एक काँग्रेसवाल्यांची जमेची बाजू आहे. महापौर निवडीमुळे पुन्हा हे राजकारण रंगणार आहे.

निवडणूक लक्षवेधी
लोकसभा निवडणुकीत लाटकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे ताराराणी आघाडी ईर्ष्येने महापौरपदाची निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार आहे. त्यातच दोन प्रभागांत पोटनिवडणूक होत असून, २३ जूनला मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीत कोणाला कोणती जागा मिळते, कोणाचे संख्याबळ वाढते, याकडेही लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com