सकाळी आठपासूनच उन्हाचा तडाखा...

कोल्हापूर - जोतिबाची चैत्र यात्रा झाली की यात्रेतील गुलाल धुवायला वळवाचा पाऊस पडतोच, असा जुना प्रघात आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात आकाशात ढग येतात, वळवाचा पाऊस पडेल असे वातावरण तयार होते; पण पाऊस पडत नाही.
कोल्हापूर - जोतिबाची चैत्र यात्रा झाली की यात्रेतील गुलाल धुवायला वळवाचा पाऊस पडतोच, असा जुना प्रघात आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात आकाशात ढग येतात, वळवाचा पाऊस पडेल असे वातावरण तयार होते; पण पाऊस पडत नाही.

कोल्हापूरचे तापमान ३९ अंशावर; आकाशात ढग, पण वळवाची हुलकावणी
कोल्हापूर - दोन ते तीन दिवस सकाळी आठपासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने जनजीवन हैराण झाले आहे. दोन दिवसांत ३७ ते ३९ अंश तापमानाची नोंद दुपारी १२ ते साडेतीन या वेळेत झाली. 

भरदुपारी शहर, उपनगरातील रस्ते ओस पडले होते. काल अन्‌ आज आर्द्रता ४१ टक्‍क्‍यांपर्यंत गेल्याने अस्वस्थता होती. जरी तापमान ३९/४० अंशापर्यंत गेले तरी आर्द्रता वाढली. ढगांचे आच्छादन ५१ टक्के झाल्याने काही ठिकाणी बाष्पीभवनाचे काळ्या ढगांचे पुंजके तयार झाले होते. दुपारी चारनंतर पाऊस पडेल असे वातावरण होते; मात्र वळीव पावसाने हुलकावणीच दिली. 

आज ३९ अंश तापमानाची नोंद झाली. सायंकाळी पश्‍चिम घाटातून येणाऱ्या वाऱ्याने आर्द्रता जराशी कमी झाली, त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. 

कोल्हापूरचे वैशिष्ट्य म्हणजे, तापमान अगदी ४०-४१ अंशापर्यंत दुपारच्या दरम्यान गेले तरी चारनंतर हा पारा झपाट्याने खाली येतो. वारा वाहू लागतो.

दोन दिवस दवबिंदूंचे प्रमाण १३ अंशापर्यंत होते. त्यातही जमिनीवरील कमाल तापमानात सतत चढ-उतार होत राहिल्याने वळीव पावसाला अनुकूल स्थिती अजूनही झालेली नाही, अशी ॲक्‍युवेदरवर नोंद आहे.  जोतिबाची चैत्र यात्रा झाली. यात्रा होऊन पाच दिवस झाले तरी पावसाला अनुकूल अशी स्थिती झालेली नाही. दरवर्षी चैत्र यात्रा झाली की, गुलाल धुवून काढण्यासाठी पाऊस येतोच, अशी लोकांची श्रद्धा आहे. 

दिवसभर ढगांचे पुंजके तयार होतात; पण वाऱ्याचा वेग आठ ते दहा किलोमीटरने वाढला की, हे पुंजके विरळ होतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com