कृष्णा काठावरील अनेक गावात उसात आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीनचे पीक

कृष्णा काठावर आंतरपिकांवर भर सोयाबिनकडे कल : नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न
Summer soybean crop sugarcane many villages banks of Krishna river farmer Manjari
Summer soybean crop sugarcane many villages banks of Krishna river farmer Manjarisakal

मांजरी : कृष्णा काठावरील शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादने घेण्याचा प्रयत्न नेहमी करतात. यंदा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे पाणीसाठा मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. याचा फायदा घेत शेतकऱयांनी आपल्या शेतात सोयाबिनसह अन्य आंतरपिकांवर भर दिला आहे. त्यातून खरीप हंगामासह अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. काही भागातील ऊस तोडणीविना तसाच शेतात उभा आहे. तर काही भागातील शेतकऱ्यांची ऊसतोडणी झाली आहे. तेथील शेतकऱ्यांची आंतरपीक घेण्यासाठी लगबग चालू झाली आहे. तर उसाच्या सरीमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड केली जात आहे. काही शेतकरी भाजीपाल्याची पिकेही घेत आहेत. राज्यातील विविध भागात हा प्रयोग राबवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्याला दुहेरी पिकाचे उत्पादन घेता येणार आहे.

उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या पेरणीला उशिर झाला असला तरी उत्पादनाला कोणताही धोका नाही. ऊस पीक बहरात येत असतानाच सोयाबीन काढणीला येते. शिवाय यासाठी वेगळे असे काहीच करावे लागत नाही. उसाची मशागत करीत असताना हे पीक सहजासहजी घेता येते, म्हणून शेतकरी हा प्रयोग करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com