उन्हाचा तडाखा; पारा @ ३४

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मार्च महिन्यातच पारा दोन अंशाने वाढला

सांगली - उन्हाळ्याच्या झळा आता जाणवू लागल्या असून गेल्या आठवडाभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढचे तीन महिने कसे काढायचे याची विवंचना आता सर्वांना जाणवू लागली आहे. पारा ३४ अंशांवर पोहोचला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. पहाटे  थंडी आणि दिवसभर कडाका, असे सध्याचे हवामान आहे.   

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये कडक उन्हाळा जाणवतो. यंदा मात्र तापमानाचा पारा मार्चच्या सुरवातीलाच चढला आहे. गेल्या काही वर्षांचा अंदाज घेता दरवर्षी तापमानात वाढच होत आहे. यंदाही मार्चमधील आतापर्यंतच्या तापमानाचा आढावा घेतला असता त्यात वाढ झालेली आहे. मार्च २०१५ मध्ये ३० अंश, तर २०१६ मध्ये ते ३२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यंदा मार्चच्या सुरवातीलाच ३४ अंशांवर पारा पोहोचला आहे. 

उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी थंड पाणी जवळ बाळगणे. तिखट व उष्ण आहार घेणे टाळले पाहिजे. आहारात काकडी, बीट, कलिंगड, लिंबू सरबत, वाळाचे सरबतांचा वापर ठेवा. अतिरिक्त आहार टाळा. सुती कपड्यांचा वापर करा.   
- डॉ. शीतल पाटील, आयुर्वेदिकतज्ज्ञ (सांगली)

Web Title: summer temperature increase