नॅव्हिगेशनवरद्वारे होते शस्त्रक्रिया; हे जाणून घेण्याची येथे संधी

Summit of Orthopedic Specialists In Sayaji Hotel Kolhapur
Summit of Orthopedic Specialists In Sayaji Hotel Kolhapur

कोल्हापूर - गाडी चालवताना जसा नॅव्हिगेशनचा उपयोग होतो तसाच हाडांची शस्त्रक्रिया करतानाही होतो. एक्‍सरेचा फोटो मोबाईमध्ये काढून सॉफ्टवेअरला दिला की आजार, उपचार, औषधे, शस्त्रक्रियेची माहिती मोबाईलच्या स्क्रिनवर येते. अस्थिरोग उपचारांमध्ये तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल झाले.

हे सर्व बदल आणि नवे तंत्रज्ञान समजावून घेण्याची संधी कोल्हापुरातील अस्थिरोग तज्ज्ञ, शल्यविषारद यांना मिळाली आहे. कारण अस्थिरोग तज्ज्ञांची शिखर परिषद व संमेलन आजपासून येथील सयाजी हॉटेलमध्ये सुरू होत आहे. तीन दिवसीय संमेलनामध्ये देशातील नामवंत डॉक्‍टर, तंत्रज्ञ आपले संशोधन, अनुभव मांडणार आहेत. 

अस्थिरोगतज्ज्ञ, शल्यविशारदांची 36 वी राज्यस्तरीय शिखर परिषद व संमेलन कोल्हापुरात आजपासून सुरू होत आहे. रविवार (ता.3) चालणाऱ्या परिषदेत परिसंवाद, मार्गदर्शन, चर्चा आणि कार्यशाळाही होणार आहेत. परिषदेमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून करण्यात येणाऱ्या जटील शस्त्रक्रियांची माहितीही दिली जाईल. यामध्ये शस्त्रक्रियेच्या नॅव्हिगेशन टेक्‍नॉलॉजीबद्दल विशेष सत्र आहे.

गाडी चालवताना आपल्याला नॅव्हिगेशनच्या माध्यमातून रस्ता तर समजतोच पण त्यावरील संभाव्य धोके, जवळचे मार्ग याचीही माहिती मिळते. याच तंत्राचा वापर आता शस्त्रक्रियेमध्ये केला जाते. मात्र यांचे तंत्रज्ञान आणि यंत्र वेगळे आहे. शस्त्रक्रीया सुरू असताना स्नायू किंवा हाडाची स्थिती, आवश्‍यक असणाऱ्या प्लास्टरचा आकार याची माहिती मॉनिटरवर दिसते. लेसर किरणांच्या माध्यमातून नॅव्हिगेशन शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या भागाची माहिती देत असते. यामुळे शस्त्रक्रियेची अचुकता तर वाढतेच पण अनावश्‍यक कट करावे लागत नाहीत.

गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रातही अनेक सॉफ्टवेअर बनवली आहेत. याचा उपयोगही शस्त्रक्रियेत होता. मोबाईलच्या एका क्‍लिकवर सॉफ्टवेअर त्या एक्‍सरेची माहिती देतात. असे अनेक नवे तंत्रज्ञान या परिषदेमध्ये पहावयास मिळणार आहेत. 
उद्या (ता. 1) सकाळी परिषदेला सुरुवात होईल. संध्याकाळी 5.15 परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. तीन दिवसात इथे विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे होणार आहेत. देशभरातील नामवंत शल्यविषारद इथे शोधनिबंध सादर करणार आहेत. 

"माझ्या चुका' व्याख्यान 

या परिषदेमध्ये डॉ. पराग संचेती हे शस्त्रक्रियेतील "माझ्या चुका आणि मी त्यातून काय शिकलो' या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. लोक आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतात; पण डॉ. संचेती हे खुल्या मनाने चुकांमधून आलेले अनुभव सांगणार आहेत. याबद्दल सर्वांनाच कुतुहल आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com