रविवारची सुटी; एटीएमची झाली वारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सांगली - पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून देण्याचे काम बंद झाल्याने बॅंकांमधील गजबजलेले काऊंटर रिकामे झाले. परंतु पुरेशा प्रमाणात पैसे उपलब्ध नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही नोटाटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आजही रविवारच्या सुटीचा योग साधून अनेकांनी एटीएमची वारी केली. बहुतांश ठिकाणी पैसे नसल्याने नागरिकांना निराशेने परतावे लागले.

दुसऱ्या बाजूला औद्योगिक कामगारांसह असंघटित क्षेत्रातील कामगारांची बॅंक खाती उघडण्याचे आदेश केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बॅंकांना दिलेत. त्यामुळे उद्यापासून बॅंकांमध्ये गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे.

आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे काम २४ तास सुरू असल्याचे चित्र आहे. बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आरबीएल, बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील चलनव्यवहार सध्या सुरू आहेत. मात्र जुन्या नोटा केवळ खातेदारांना बदलून दिल्या जात असल्याने गजबजलेले काऊंटर रिकामे झाले आहेत. दररोज अडीच हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून शंभर, पन्नासच्या नोटा न दिल्यामुळे या बॅंकांची कोंडी झाली आहे. दैनंदिन व्यवहार विस्कळित झाले आहेत. 

एटीएम मशीनमधील पैसे दिवसाला संपत असल्याने अनेक ठिकाणी ‘नो कॅश’चे फलक लागले आहेत. त्यामुळे पैशांसाठी धावाधाव सुरूच आहे. 
नोटा टंचाई कधी हटणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. पेन्शनरांना दोन हजाराच्या नोटा मिळाल्या, परंतु त्या खपवायच्या कुठं? असाही प्रश्‍न कायम आहे.

कारखान्यातील कायम, तात्पुरते, हंगामी व कंत्राटी कामगारांचे नोव्हेंबर महिन्यातील पगार बॅंकेमार्फत करावेत, असा आदेश सहायक कामगार आयुक्तांचा आला आहे. त्यामुळे बॅंकेमार्फत पगार न करणाऱ्या उद्योजकांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे सर्व कामगारांची नोंदणी सुरू आहे. ज्यांचे खाते नाही, त्यांचे तातडीने खाते उघडले जात आहे. या निर्णयामुळे सर्व कामगार रेकॉर्डवर येतील.
- सतीश मालू, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर

Web Title: Sunday holidays; ATM was undemocratic