सुनील मानेंनाच पुन्हा संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

सातारा - सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी 48 जिल्हा प्रतिनिधींमधून एकही जण इच्छुक नसल्याने विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे. याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच करणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. येत्या आठवडाभरात जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा प्रतिनिधींची बैठक मध्यंतरी पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्या अध्यक्षतेखाली येथील राष्ट्रवादी भवनात झाली. या बैठकीस 48 जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी एकाही प्रतिनिधीने आपण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नाही. उलट सर्वांनी माने यांचे काम चांगले आहे. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार घुले यांनी माने यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा माने यांचीच वर्णी लागणार हे निश्‍चित आहे. येत्या आठवडाभरात प्रदेशाध्यक्ष पाटील हे याबाबतची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 

धुमाळांची इच्छा पूर्ण होणार?
पक्षनिरीक्षक घुले यांना आपण कार्याध्यक्ष किंवा वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते सुधीर धुमाळ यांनी कळविले होते; परंतु पक्षात कार्याध्यक्ष हे पद नाही. तर वरिष्ठ उपाध्यक्षपद हे जिल्हाध्यक्षच निवडतो. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीनंतरच याबाबतची सूचना जिल्हाध्यक्षांना केली जाईल, असा शब्द घुले यांनी श्री. धुमाळ यांना दिला आहे. त्यामुळे श्री. धुमाळ यांची जिल्हा कार्यकारिणीत पदाधिकारी होण्याची इच्छा पूर्ण होणार का, हा प्रश्‍न आहे. 

Web Title: sunil mane get once more chance