सहायक पोलिस निरीक्षकासह तिघा पोलिसांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोल्हापूर - पेठवडगाव येथील बहुचर्चित सनी पोवार खून खटल्यात आज सहायक पोलिस निरीक्षकासह तिघा पोलिसांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. त्या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक संजीव रामचंद्र पाटील (वय 45, पाषाण, पुणे) सहायक फौजदार बबन दादू शिंदे (वय 57, रा. पोहाळे तर्फ आळते, पन्हाळा) आणि पोलिस नाईक धनाजी शिवाजी पाटील (वय 48, रा. लाइन बझार) अशी त्यांची नावे आहेत. सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ही शिक्षा सुनावली.

पोलिस ठाण्यात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पेठवडगाव येथील कार्यकर्ता जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवारचा मृत्यू झाल्यामुळे या खटल्याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. 23 ऑगस्ट 2014ला पोवारच्या मृत्यूनंतर पेठवडगावसह जिल्ह्यात अशांतता निर्माण झाली होती. पोलिसांवरच भा.दं.वि.स. कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांसह सर्वसामान्यांचे या निकालाकडे लक्ष लागून होते. या निकालानंतर जिल्ह्यातील पोलिसांत एकच चर्चेचा विषय ठरला. विशेष सरकारी वकील म्हणून अशोक रणदिवे यांनी काम पाहिले.
पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे 23 ऑगस्ट 2014 ला कार्यकर्ता सनी पोवार याने बसवर दगडफेक केली म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला. त्याला आंबेडकर चौकातून माराहण करीत पोलिस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजीव रामचंद्र पाटील याच्यासह इतरांनी त्याला टीव्ही रुममध्ये नेले. तेथे त्याला मारहाण केली. तेथे त्याच्या पोटात दुखू लागल्यामुळे पोलिसांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे त्याला मयत घोषित केले. यानंतर सनीचा भाऊ जयदीप प्रकाश पोवार याने वडगाव पोलिस ठाण्यात संजीव पाटील, बबन शिंदे आणि धनाजी पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार त्यांच्यावर 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला. यामुळे मृतदेह पुढील तपासणीसाठी मिरज मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले. यानंतर पुरावा दाखल करून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. तत्कालीन सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके व त्यानंतर एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी सुरू राहिली.

Web Title: Sunny Powar murder case