कृत्रिम साधनांचा पुरवठा करताना अपंगांची चेष्ठा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

कोल्हापूर - अपंगांना घरातून बाहेर पडायचे झाले तर त्यांना कृत्रिम साधनांचा आधार आवश्‍यक असतो. अशा कृत्रीम साधनांच्या वापरापासून एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे अपंगांना वंचित ठेवण्याचा विक्रम कोल्हापुरातील अपंग पुनर्वसन केंद्राकडून घडला आहे. परिणामी अपंगांच्या वेदनेवर फुंकर मारण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार येथे सुरू आहे. याबद्दल अपंगांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर - अपंगांना घरातून बाहेर पडायचे झाले तर त्यांना कृत्रिम साधनांचा आधार आवश्‍यक असतो. अशा कृत्रीम साधनांच्या वापरापासून एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे अपंगांना वंचित ठेवण्याचा विक्रम कोल्हापुरातील अपंग पुनर्वसन केंद्राकडून घडला आहे. परिणामी अपंगांच्या वेदनेवर फुंकर मारण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार येथे सुरू आहे. याबद्दल अपंगांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी अपंग पुनर्वसन केंद्र कसबा बावडा येथे आहे. केंद्रामार्फत अपंगांना विविध योजनांचा लाभ देत त्यांचे जगणे सुसह्य करण्याची जबाबदारी आहे. याचाच भाग म्हणून अपंगांना दैनदिन हालचाली करण्यासाठी कृत्रिम अवयव साधने देण्यात येतात. त्यासाठी अपंग व्यक्तींना या केंद्राकडे अर्ज करावा लागतो. गेल्या दोन वर्षांत जवळपास पाचशेहून अधिक अर्ज अपंग व्यक्तींनी केले आहेत; मात्र त्यापैकी कोणालाही कृत्रिम अवयव देण्यात आलेले नाहीत. 
अशा स्थितीत अपंग व्यक्तींना रोजच्या हालचाली करणेही अवघड झाले आहे. सर्वच अपंग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सधन वर्गातील नाहीत. त्यामुळे खासगी संस्थाकडे असे कृत्रिम अवयव मिळत असले तरी एका अवयवासाठी किमान 2500 ते 5000 हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागते. जिल्हा नियोजन समितीकडून काही निधी अंपग कार्यासाठी पाठविला गेला तरी पाचशे अपंगांची साधने देण्याचा प्रश्‍न मिटू शकेल. पण जिल्हा नियोजनच्या बैठकीत अनेकदा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तसेच मूलभूत सुविधा यावर चर्चा होते. यात अपंगांचे पुनर्वसन यावर चर्चाच होतच असे नाही 

अपंग पुनर्वसन केंद्राकडे प्रलंबित असलेले अवयव मागणी अर्ज -
श्रवणयंत्र 350 
पांढरी काठी 10 
वॉकर 10 
व्हीलचेअर 29 
तीन चाकी सायकल 43 
कृत्रिम हात 2 
स्टिक 11 

""अपंग व्यक्‍तींना कृत्रिम अवयव देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुंबईतील मुख्यालयाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे तसेच केंद्र सरकारकडून कृत्रिम अवयवदानासाठी निधी यावा लागतो. तो निधी आलेला नाही. येत्या महिनाभरात हे सर्व काम मार्गी लागावे यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत.'' 
अजित पाटील, जिल्हा व्यवस्थापक अपंग पुनर्वसन केंद्र 

""अपंग व्यक्तींना कृत्रिम साधने देण्यात अपंग पुनर्वसना केंद्राकडून विलंब होत आहे. परिणामी अपंग व्यक्तीची ससेहोलपट सुरू आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून उद्या, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संस्थेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.'' 
देवदत्त माने प्रहार संस्था 

Web Title: supply of artificial devices Handicapped