शिराळ्यात 'नापासांची मोफत आधार शाळा' उपक्रम

शिवाजीराव चौगुले
मंगळवार, 3 जुलै 2018

शिराळा : ७ जुलै ते २० ऑगस्ट २०१८ दरम्यान शिराळा व इस्लामपूर येथे नापासांची मोफत आधार शाळा हा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात येत असल्याची माहिती अॅड रवी पाटील यांनी दिली.

शिराळा : ७ जुलै ते २० ऑगस्ट २०१८ दरम्यान शिराळा व इस्लामपूर येथे नापासांची मोफत आधार शाळा हा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात येत असल्याची माहिती अॅड रवी पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, १० वी व १२ वीत नापास झाल्याने नशीब घडवण्याच्या वयातच विद्यार्थ्यांच्यात नैराश्य निर्माण होऊन अनेकवेळा नको त्या गोष्टी घडतात. तर काहीजण नको तिकडे भरकटत जातात. अशा विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हा सामाजिक उपक्रम सुरु करत आहे. यासाठी नापासांची मोफत आधार शाळा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.जय क्षीरसागर यांची मोलाची साथ व मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या या शाळेचा सलग २२ वर्षे १००टक्के निकाल लागत आहे. तरी दहावी व बारावीच्या (कला व वाणिज्य) नापास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.

सामाजिक बांधिलकी म्हणून हा शिराळा व वाळवा तालुक्यात हा अभिनव उपक्रम स्व.माजी आमदार भगवानराव पाटील शिक्षण संस्था सांगली यांच्या माध्यमातून राबवत आहोत.इस्लामपूर येथे संभूआप्पा मठ तर शिराळा येथे सागावकर हॉस्पिटल कोकरुड नाका येथे ७ जुलै पासून सुरु करत आहे.ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना या उपक्रमातून चांगली संधी मिळेल.नैराशेत असणाऱ्या तरुण पिढीच्या भविष्याला प्रगतीचा मार्ग मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.
- अॅड रवी पाटील

Web Title: support school for fail students in shirala