सोलापूर महापालिका ज्येष्ठांसाठी आधारवड 

Support for senior citizen for Solapur Municipal Corporation
Support for senior citizen for Solapur Municipal Corporation

सोलापूर : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला महापालिका येणार आहे. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार खातेनिहाय कृती आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 
शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन करणे, आरोग्याची काळजी घेणे, ताण तणावास तोंड देण्यासाठी सक्षम करणे यासाठी आवश्‍यक सूचना या आराखड्यात करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकांनी करावयाच्या सुविधांबाबत धोरण निश्‍चित केले असून, त्यानुसार कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.

या सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करून आराखडा निश्‍चित करण्याचे आदेशही आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य, सामान्य प्रशासन, उद्यान, परिवहन, बांधकाम परवाना, कर आकारणी विभागाने काम करण्यास सुरवात केली आहे. 

ज्येष्ठांना मिळतील या सुविधा 
- महापालिकेच्या रुग्णालयांत स्वतंत्र व्यवस्था. 

- ज्येष्ठांचा अनुभव व ज्ञानाचा फायदा.

- नाममात्र दर किंवा मोफत जागा मिळणार.

- उद्यानात बाक आणि व्हील-चेअरची सुविधा.

- महापालिका करामध्ये सवलत.

- विरंगुळा केंद्राची स्थापना

फार चांगला निर्णय महापालिकेने घेतला आहे. शासनाच्या सूचनेनुसार त्वरित कार्यवाही होण्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत. या योजनांमुळे शहरातील ज्येष्ठांच्या विरंगुळ्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.
 
- गुरुलिंग कन्नूरकर, अध्यक्ष सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ, सोलापूर

महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपाय योजना कराव्यात. शासनाने दिलेल्या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी, त्यामुळे ज्येष्ठांना निश्‍चित दिलासा मिळेल. 

- व्ही. एम. जोजन, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, बंधनाळ मठ, सोलापूर

ज्येष्ठांना दिलासा देण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन आयुक्तांनी स्मार्ट सोलापुरातील ज्येष्ठांना दिलासा दिला आहे.

- धोंडिबा नारायणकर, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com