नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जून 2016

नगर - ताणतणावानंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्यातील युती महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत टीकल्याचे पहायला मिळाले. भारतीय जनता पक्षातील गांधी गटाच्या उमेदवार नंदा साठे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा कदम यांची महापौरपदी, तर भाजपच्या श्रीकांत छिंदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक काही तासांवर आल्यानंतरही "कोणाच्या गळ्यात माळ पडणार,‘ याची उत्कंठा कायम होती. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता. महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. 

शिवसेनेसाठी मागील आठवड्यापर्यंत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक खासदार दिलीप गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांच्या एकत्र येण्यामुळे चुरशीची झाली होती. भारतीय जनता पक्षातील गांधी गटाच्या नंदा साठे व श्रीकांत छिंदम यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. पण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर नंदा साठे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सुरेखा कदम यांची बिनविरोध निवड झाली. दिलीप गांधी आणि एकनाथ शिंदे हे एकाच गाडीतून सभागृहात आल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे महापौरपद शिवसेनेला आणि उपमहापौरपद गांधी यांच्या गटाला मिळाल्याचे पहायला मिळाले.

एकूण 68 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी 35 मतांची गरज होती. चुरशीचे रूपांतर तणावात होऊ लागल्याने प्रशासनानेही या निवडणुकीची गांभीर्याने नोंद घेतली होती. निवडणुकीच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढला आहे. 

Web Title: surekha kadam mayor of nagar