राष्ट्रीय पक्ष म्हणता अन् उमेदवार देऊ शकत नाही; धस यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेण्यात आल्यानंतर भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. ठरवलेला उमेदवार ते तीन दिवस सुद्धा टिकवू शकले नाही असेही ते म्हणाले.

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेण्यात आल्यानंतर भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. ठरवलेला उमेदवार ते तीन दिवस सुद्धा टिकवू शकले नाही असेही धस म्हणाले.

स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देऊ शकत नाही, राष्ट्रीय पक्ष म्हणवता, या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षाची सगळी गेली असे धस म्हणाले. आता राष्ट्रवादी पक्षात असलेल्या आमच्या मित्रांनाही आता रस्ता मोकळा झाला आहे असेही ते म्हणाले. 

रमेश कराड यांनी 2 मे रोजीच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेसाठी कराड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश कराड यांना पक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का दिला होता. मात्र हा अर्ज आज मागे घेण्यात आल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

 

Web Title: suresh dhas attack ncp after ramesh karad withdraws his Nomination In Legislative Council Election