महाराष्ट्र क्रांती सेना निवडणूक लढविणार - सुरेशदादा पाटील

महाराष्ट्र क्रांती सेना निवडणूक लढविणार - सुरेशदादा पाटील

कोल्हापूर - राज्यातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ मतदारसंघात महाराष्ट्र क्रांती सेनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षप्रमुख सुरेशदादा पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

पक्षाचा पहिला मेळावा २५ नोव्हेंबरला पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक रिंगणात असतील. 

- सुरेशदादा पाटील.

श्री. पाटील म्हणाले, "रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना केली आहे.‌ पक्षाचे मुख्य संस्थापक उदयनराजे भोसले असून, पक्षाला वेगळे वलय मिळाले आहे. सेनेचा २५ नोव्हेंबरला पहिला मेळावा पेठ वडगाव, तर दुसरा शिरोळ येथे होत आहे. त्यानंतर राधानगरी, भुदरगड, चंदगड येथे मेळावे होतील. मतदारांना महाराष्ट्र क्रांती पक्ष तिसरा पर्याय वाटत आहे. पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी होऊ लागली आहे. ही स्थिती लक्षात घेता राज्यातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे."

सत्ताधाऱ्यांविरोधात आम्ही लढणार असून आमचे अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. शेतकऱ्यांच्या नऊ संघटना आमच्या पाठीशी आहे. आमचे धोरण ठरलेले आहे.

-  सुरेशदादा पाटील

मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यावर आमचा भर राहणार असून यापुढे मराठा समाज कोणालाही सहजासहजी वापरता येणार नाही. बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांना पन्नास टक्के उमेदवारी देणार असून युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे." असेही पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस राज्य कमिटी सदस्य मदन चव्हाण, प्रा. शिवाजी लोंढे, राहुल इंगवले, उदय लाड, राणी पाटील, जयदीप शेळके, भरत पाटील, परेश भोसले, चंद्रकांत पाटील, मोहन मालवणकर प्रवीण माळी एस. पी. कांबळे, राजू दबडे, सुनिता पाटील, अशोक नाईक, राजू नाईक, मारुती जांभळे, पूजा पाटील, सुजाता खाडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com