संवेदनशील मतदान केंद्रांचा सर्व्हे सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिकेने दिलेल्या प्रारूप मतदान केंद्राच्या यादीनुसार पोलिसांनी संवेदनशील मतदान केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. २०१२ च्या निवडणुकीत ३३८ संवेदनशील केंद्रे होती. पोलिसांच्या सर्व्हेनुसार त्यात भर पडणार की कपात होणार, हे आठ फेब्रुवारीला स्पष्ट होईल. 

सोलापूर - महापालिकेने दिलेल्या प्रारूप मतदान केंद्राच्या यादीनुसार पोलिसांनी संवेदनशील मतदान केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. २०१२ च्या निवडणुकीत ३३८ संवेदनशील केंद्रे होती. पोलिसांच्या सर्व्हेनुसार त्यात भर पडणार की कपात होणार, हे आठ फेब्रुवारीला स्पष्ट होईल. 

२००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १८१ केंद्रे संवेदनशील होती. ही संख्या २०१२ मध्ये ३३८ वर पोचली. गत निवडणुकीवेळी अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नाही, असा अहवाल पोलिस विशेष शाखेने महापालिका आयुक्तांना पाठविला होता. यंदा काही प्रभागांमध्ये अतिशय चुरशीची लढत आणि तीही तणावपूर्ण वातावरणात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील मतदान केंद्राबाबतही चाचपणी सुरू झाली आहे. 

एका निवडणुकीच्या वेळी काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रे फोडण्याचे प्रकार झाले होते. किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही झाले होते. यंदा राजकीय पक्षांची वाढलेली संख्या, युती-आघाड्यांवरून तापलेले राजकारण यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि हत्यारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे नियोजन पोलिसांनी सुरू केले आहे.

संवेदनशीलतेची कारणे....
 आपसांतील भांडणे  हिंदू-मुस्लिम तणाव  दलित-सवर्णांमध्ये तक्रारीच्या घटना  अंतर्गत गटबाजीचे राजकारण    २०१२ मध्ये दाखल झालेले गुन्हे

Web Title: Survey sensitive polling stations started