दुसरा वसंतराव नाईक नको म्हणून हिसकावली मुख्यमंत्रीपदाची संधी

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 16 एप्रिल 2018

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे दुसर्यांदा मुख्यमंत्री झाले तर ते पुन्हा लवकर हलणार नाहीत. ते दुसरे वसंतराव नाईक होतील हे अोळखून आमच्यातील काही चलाख लोकांनी मला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. 

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे दुसर्यांदा मुख्यमंत्री झाले तर ते पुन्हा लवकर हलणार नाहीत. ते दुसरे वसंतराव नाईक होतील हे अोळखून आमच्यातील काही चलाख लोकांनी मला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. 

श्री. शिंदे यांनी आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि असलेल्या प्रेरणाभूमीस भेट दिली. त्या ठिकाणी आयोजिलेल्या कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री झाल्यावर 1 लाख 80 हजाराचा अनुशेष भरण्यासाठी नियोजन केले. समाजातील दुर्लक्षित समाज घटकांना न्याय देणारे निर्णय घेतले. त्यामुळे राज्यात
पुन्हा कांग्रेसची सत्ता आली. पण आमच्यात काही चलाख लोक होते. त्यांनी मी मुख्यमंत्री होणार नाही याची दक्षता घेतली. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते 
या पदावरून लवकर हटणार नाहीत हे त्यांनी अोळखले आणि माझी संधी गेली, असे श्री. शिंदे म्हणाले.

दलित समाजातील पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मला मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा संधी गेल्याचे दुख झाले नाही. उलट राज्यपाल होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
त्यानंतर काही दिवसांनीच सोनिया गांधी यांनी मला केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले. ज्या खात्याची धुरा बाबासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळली, त्या उर्जा खात्याचे मंत्रीपद
मला दिले. बुढी का बाल विकणार्यास लोकशाहीतल्या सर्वोच्च सभागृहाचा नेता होण्याचा मान मिळाला. जीवनात आणखीन काय हवे आहे. राजकीय वाटचालीत
ज्या पदावर गेले, तेथून उपेक्षित, दलित व शोषित वर्गाच्या उन्नतीला प्राधान्य दिले, असेही श्री. शिंदे म्हणाले.

खासदार बोलका असावा
लोकप्रतिनिधी हा अभ्यासू असला पाहिजे. त्यामुळे तो सभागृहात आवाज ऊठवू शकतो. संसदेतील खुर्च्या या केवळ बसण्यासाठी नसतात. आपल्या मतदार संघातील 
प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात बोलले पाहिजे. संसदेत जाणारा खासदार हा बोलका असावा, खुर्चीवर गप्प बसणारा नसावा, असा चिमटाही श्री. शिंदे यांनी काढला.

Web Title: Sushil Kumar Shinde speaks out about missed chance to become CM of Maharshtra