'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज (ता.20) टीका  केली. 

ःसोलापूर- "भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज (ता.20) टीका  केली. 

पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर शिंदे बोलत होते. ते म्हणाले,"नैसर्गिक आपत्तीवेळी कोणतीही राजकीय भूमिका न ठेवता जास्तीत जास्त मदत देणे आवश्‍यक असते. मात्र, ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, त्या राज्यांना मदत द्यायची नाही, अशी भूमिका आताच्या पंतप्रधानाची आहे. पुरामुळे केरळमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर तेथील शासनाने दोन हजार कोटींची मदत मागितली, मात्र त्यांना पाचशे कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे "हम राष्ट्र निर्माण की बात करते है'चा ते सातत्याने नारा देत असतात.''

सोलापूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले, "अजुन काही चर्चा झालेली नाही. त्याबाबत लवकरच काहीतरी धोरण ठरेल. दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी भारिपतर्फे प्रकाश आंबेडकर यांचे नाव चर्चेत असून, ते या मतदारसंघासाठी एमआयएमसोबत आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

Web Title: Sushilkumar shinde criticise on PM narendra Modi