रोजगार देणारे नेते म्हणतात, 'पकोडा व भजी तळा': सुशीलकुमार

Solapur
Solapur

सोलापूर ः "सत्तेवर आल्यावर दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची भाषा बोलणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर आल्यावर "पकोडे व भजी तळा' असे सांगत कोट्यवधी युवकांची फसवणूक केली आहे'', अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

एन.एस.यु.आय.विद्यार्थी संघटना आयोजित बेहतर भारत उपक्रमाद्वारे संकल्प-2019 विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार प्रणिती शिंदे,आमदार सिध्दाराम म्हेत्रे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार, महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय चे अध्यक्ष आमिर शेख, शहराध्यक्ष प्रकाश वाले,महिला अध्यक्ष इंदुमती अलगोंडा,हेमा चिंचोळकर,कल्याणराव काळे,गटनेते चेतन नरोटे,बाळासाहेब शेळके,संजय हेमगड्डी,अरूण शर्मा,आशपाक बळोरगी,सुदिप चाकोते,पंडित सातपुते उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, "आगामी निवडणुकीत लोकशाही आणून विद्यार्थी व युवकांनी इतिहास घडवावा.समाजातील विषमता मिटवण्यासाठी युवकांना पुढाकार घ्यावा. दोन कोटी युवकांना रोजगार देणारे भाजप सरकार पकोडा भजी तळून रोजगार करण्याचा सल्ला देत आहे. युवकांच्या माध्यमातून बेरोजगारी,जातीयता,दहशतवाद या विषयावर सरकारच्या चुकीच्या निर्णयाद्वारे विरोध करून सरकार उलटून टाकण्याचा आज सर्वांनी संकल्प करावा."

संयोजक गणेश डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदेश सचिव शुभम माने,प्रतिक शिंगे,निवृत्ती गव्हाणे,शिवराज बिराजदार,मनोज आदटराव,सिध्दाराम सागरे,अजित पवार,सागर राठोड,चंद्रकांत नाईक,रजनीकांत जाधव,दिनेश डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com