सुशीलकुमार की प्रणिती; सोलापुरात उत्सुकता 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उभारणार की आमदार प्रणिती शिंदे याबाबत उत्सुकता आहे. शिंदे उभे राहिले तर कॉंग्रेसचा झेंडा सोलापूर लोकसभेवर पुन्हा फडकेल असा अंदाज व्यक्त होत आहे. 

सुशीलकुमार शिंदे उमेदवार असताना कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघात 2014 मध्ये तडा गेला आणि भाजपचे ऍड. शरद बनसोडे हे शिंदे यांचा पराभव करून निवडून आले. ऍड. बनसोडे लाटेत निवडून आले की, लोकांना बदल हवा होता ही बाब निराळी, मात्र दिग्गज उमेदवार असताना कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला, हे धक्कादायक होते. 

वास्तविक पाहता शिंदे यांना 2014 मध्ये मिळालेल्या मतांची संख्या पाहता 2009 च्या तुलनेत काहीही फरक नव्हता. फरक पडला तो मोदी इफेक्‍टचा, तरीसुद्धा ऍड. बनसोडे यांना मताधिक्‍य मिळण्यामागे कॉंग्रेसमधीलच काहीजणांचा हात होता, हे नंतर स्पष्ट झाले. नंतर ते उघडपणे बोलले गेले, मात्र वेळ निघून गेली होती. भाजपचे लिंगराज वल्याळ, प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि सुभाष देशमुख यांचा कालावधी वगळता या मतदार संघात सातत्याने कॉंग्रेसला संधी मिळाली. कॉंग्रेसचे सूरजरतन दमाणी, गंगाधरपंत कुचन, धर्मण्णा सादूल व शिंदे यांचे या मतदार संघावर वर्चस्व होते. हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असताना शिंदे विजयी झाले, मतदारसंघ राखीव झाल्यानंतर मात्र त्यांचा पराभव झाला. 

केवळ आश्‍वासने देणारे मोदी सरकार अशी प्रतिमा सध्या झाली आहे. गेल्या चार वर्षांत सोलापूर शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही. घोषणा अनेक योजनांच्या झाल्या, प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे शिंदे यांच्या पराभवाचा फटका निश्‍चितच सोलापूरला बसला आहे, हे आता केवळ कॉंग्रेसच नव्हे तर भाजपमधीलही काही धुरिणांचे मत झाले आहे. सत्ता नसली तरी शिंदे खासदारकीच्या माध्यमातून अनेक योजना आणू शकले असते याबाबत सार्वमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे राजकीय व्यासपीठावर विरोधक असले तरी, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या कालावधीतही शिंदे सोलापूरसाठी खूप काही करू शकले असते, असा मतप्रवाह आज तयार झाला आहे. या सर्व घडामोडी पाहता 2019 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत त्याचा कसा फायदा घ्यायचा हे शिंदे यांच्या भूमिकेवरच ठरणार आहे.

सध्यातरी शिंदे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत, आमदार कन्या प्रणितींचे नाव ते पुढे करत आहेत. मात्र, कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामान्य मतदारांची अपेक्षा पाहता ते काय निर्णय घेतात, यावरच सोलापूर लोकसभेसाठीचे कॉंग्रेसचे गणित ठरणार आहे. 

इच्छुकांची मांदियाळी 
सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान ऍड. बनसोडे हे पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षातील राज्यसभा खासदार अमर साबळे यांचे 
नाव पुढे येऊ लागल्याने बनसोडे चिंतेत आहेत. शिंदे यांच्यासह भारिपचे ऍड. प्रकाश आंबेडकर, आमदार रमेश कदम, रिपाइंचे राजा सरवदे ही नावेही चर्चेत आहेत. त्यात आता नवीन भर आमदार प्रणिती शिंदेंची पडली आहे. उमेदवारीसाठी निर्माण झालेली चुरस पाहता सोलापूर लोकसभा निवडणूक ही रंगतदार ठरणार याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.

Web Title: sushilkumar shinde or praniti shinde excitement in solapur