कार्यकारणीत स्थान न मिळालेले सुशीलकुमार म्हणाले, 'नो रिऍक्‍शन' 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 18 जुलै 2018

खासदार राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कॉंग्रेसची तत्कालीन कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली व कार्यकारिणी निवडीचे सर्वाधिकार श्री. गांधी यांना देण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी नव्या कार्यकारिणीची यादी प्रसिद्ध केली.

सोलापूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश नाही. यासंदर्भात सोलापुरात त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, "मला माहिती आहे. नो रिऍक्‍शन' असे उत्तर दिले. 

खासदार राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कॉंग्रेसची तत्कालीन कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली व कार्यकारिणी निवडीचे सर्वाधिकार श्री. गांधी यांना देण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी नव्या कार्यकारिणीची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये स्वतः श्री. गांधी यांच्यासह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अन्टोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमेन चंडी, तरूण गोगई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरिष रावत, कुमारी शेलजा, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरीया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीना, गायखनम व श्री. गेहलोत यांचा समावेश आहे. 

कायम निमंत्रितांमध्ये शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योतिदारित्य सिंधीया, बाळासाहेब थोरात, तारीक हमीद कर्रा, पी.सी. चाको, जितेंद्रसिंह, आरपीएन सिंग, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुनतिया, अनुराग सिंग, राजीव सातव, शक्तीसिंह गोहिल, गुरव गोगई व डॉ. ए. चेल्ला कुमार यांचा समावेश आहे. विशेष निमंत्रितांमध्ये के. एच. मुनियप्पा, अरूण यादव, दीपेंदर हुडा, जतीन प्रसाद, कुलदीप बिष्णोई यांच्यासर कांग्रेसच्या विविध विभागाच्या अध्यक्षांचा समावेश आहे. कार्यकारिणीमध्ये श्री. शिंदे यांचा समावेश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांचा समावेश न झाल्याने सोलापुरातील कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

Web Title: Sushilkumar Shinde reaction on Congress committee