काँग्रेस मदत करते, पण शेतकऱ्यांकडून घोटाळा : सुशिलकुमार शिंदे

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मंगळवेढा : काँग्रेस शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून निवडणूक काळात शेतकऱ्यांकडूनही ऐन वेळेस घोटाळा होतो, आता होणार नाही ना असा सवाल करत आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत लोकसभेचा संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले.

मंगळवेढा : काँग्रेस शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून निवडणूक काळात शेतकऱ्यांकडूनही ऐन वेळेस घोटाळा होतो, आता होणार नाही ना असा सवाल करत आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत लोकसभेचा संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की आपण 12 वेळा निवडून गेलो. त्यामुळे आता नवीन पिढीली संधी द्यावी इच्छा होती पण पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर निवडणूक लढविण्यास तयार आहे. मंगळवेढ्याचा दुष्काळ नवीन नाही. दुष्काळात शासन फक्त आश्वासन देत बसले शेतकऱ्यांना काहीच नाही दिले तर शेतकऱ्यांकडून होणाऱ्या आंदोलनात सहभागी  होणार आहे. पाहणी पथकाने काय अहवाल दिला त्याची छाणणी होऊन पंधरा दिवस झाले तरी उपाययोजना केल्या जात नाहीत. पण हे दिल्ली व मुंबईचे शेतकऱ्यांची काळजी घेत नाही. कोणतेही निकष न ठेवता एका फटक्यात कर्जमाफी काॅग्रेसनेच दिली.

आ.भालके म्हणाले की, दुष्काळी मदतीसाठी तालुक्यासाठी 394 कोटीबाबत लक्षवेधी केल्यावर फक्त 57 कोटी दिले.एक रू ची लोकवर्गणी न देता भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर घेतली.त्या योजनेचे पाणी सुरू झाले.पशुधन वाचवण्यासाठी चारा व पाण्याची गरज आहे. पण अजून काहीच उपाय योजना केल्या नाहीत त्यासाठी प्रत्येक गावात चारा डेपोची मागणी जिल्ह्याधिकाय्राकडे केली.संसदेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगून कृषीमंत्र्यानी देशाची थट्टा केली.

दक्षिण भागातील म्हैसाळच्या पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच उपोषण करून पाणी आणल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. 35 गावाच्या पाण्याबाबत सरकारची कपट भावना लक्षात आल्याने लगेच दोन वर्षात याचिका दाखल केली. यासाठी पाच पावले मागे सरण्याची तयारी पण दक्षिण, उत्तर, सांगोला तालुक्यातील जुन्या योजनेला पैसे मग मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांनी सरकारचे काय वाकडे केले का? या सत्तेपासून बाजूला करण्याची गरज आहे. मागची चुक दुरूस्त करण्याची वेळ आलीय खंबीर निर्णय घ्यावा तळ्यात मळ्यात करू नये तुमच्या साठी जिवाचे रान करू असे सांगितले. यावेळी अॅड नंदकुमार पवार,शिवाजीराव काळुंगे,प्रकाश पाटील यांची भाषणे झाली.प्रास्ताविक अॅड रविकिरण कोळेकर यांनी केले.

रड्डे येथे काॅग्रेस पक्षाचा दुष्काळी जनतेशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. भारत भालके, नगरसेवक चेतन नरोटे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष नितीन नागणे, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, पक्षनेते नितीन पाटील, राजश्री टाकणे, लता कोळेकर, अंजली मोरे, रिझवाना तांबोळी, अॅड. नंदकुमार पवार, सुरेश कोळेकर, मारूती वाकडे, प्रकाश गायकवाड, दिलीप जाधव, सचिन शिंदे, नाथा ऐवळे, युवराज शिंदे, महेश दत्तु, देविदास इंगोले, ज्ञानेश्वर खांडेकर, अमोल माने, उपस्थित  होते.

Web Title: sushilkumar shinde speech on Farmers