लोकसभेबाबत वेळ आल्यावर विचार करू: सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनवणे 
मंगळवार, 17 जुलै 2018

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी "जनवात्सल्य'वर बैठक झाली. या बैठकीनंतर श्री. शिंदे बोलत होते. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारीपचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, पिंपरी-चिंचवडचे राज्यसभा खासदार अमर साबळे, मोहोळचे आमदार रमेश कदम यांची नावे चर्चेत आहेत.

सोलापूर : लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत अद्याप काही निश्‍चित केले नाही, मात्र वेळ आल्यावर त्याबाबत विचार करू, असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी "जनवात्सल्य'वर बैठक झाली. या बैठकीनंतर श्री. शिंदे बोलत होते. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारीपचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, पिंपरी-चिंचवडचे राज्यसभा खासदार अमर साबळे, मोहोळचे आमदार रमेश कदम यांची नावे चर्चेत आहेत. या संदर्भात विचारले असता श्री. शिंदे म्हणाले,""ज्यांना उभारायचे असते ते घोषणा करीत असतात. आपले मत व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार आहे. माझ्या पुरते बोलायचे झाल्यास वेळ आल्यावर मी या संदर्भात भूमिका स्पष्ट करेन.'' 

बोरामणीचे विमानतळ होणार नाही हे खासदार ऍड. शरद बनसोडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले,""या विमानतळासाठी मी केंद्रीय मंत्री असताना प्रयत्न केले. काही महिन्यापूर्वी विमान उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठविले होते. त्यांनीही त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाला पत्र लिहले होते. राष्ट्रीय स्तरावरील विमान प्राधिकरणानेही या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्प रखडला आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत या ठिकाणाहून विमाने उडण्यास सुरूवात झाली पाहिजे होती, मात्र तसे झाले नाही हे आपले दुर्देव आहे.'' 

Web Title: Sushilkumar Shinde talked about contest to 2019 loksabha election